![]() |
| फोटो क्रेडीट : गुगल |
मनावर प्रचंड ताण वाढत चाललाय .... 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर'
असं गेल्या कित्येक महिन्यांपासून चालू आहे. किती दिवसांपासून एक वर्ग खोली मिळत नाहीए ! किमान भाड्याची रूम सुद्धा मिळू नये गावात ? प्रचंड स्ट्रेस वाढत चाललाय असं वाटत असतानाच अचानक कोणीतरी 75 वर्षाचे वयोवृद्ध शाळे जवळ घेऊन विचारतात , "बाई तुला काही अडचण आहे का ? " मी आश्चर्याने विचारते, "तुम्हाला कोणी पाठवलं का ? किंवा " तुम्हाला असं काही कळलं का की मला रुम हवी आहे ?" ,तेव्हा .. "नाही,मी नाशिकला असतो कधीतरी इकडे येतो.माझ्या दोन तीन रूम खाली आहेत आणि जरा इकडे चक्कर मारला तर अस दिसल की एकाच वर्गात शाळा आहे ! अशी कशी शाळा असेल ना ? " ,अर्थात ते बाबा म्हणजे खूप मोठा आशेचा किरण होते. त्यानंतर दुसरी रूम मिळाली हे हेही ठीकच झालं . पण दिवसभराचा किंबहुना गेल्या चार महिन्याचा प्रचंड मोठा स्ट्रेस आज सहनच होईना ! तितक्यात एका मित्राचा फोन येतो कामानिमित्ताने, आणि पहिल्यांदा मी असं म्हणते की , "यार आज मोडून पडायला झालय मला ! " ,तोपर्यंत मैत्रिणीच्या आजारपणाच टेंशन काही कमी झालेलं नव्हतं. गेल्या दोन दिवसापासून केवढी आजारी आहे ! तितक्यात तिसऱ्या मैत्रिणीचा मेसेज येतो की, "अरे ती फोन उचलत नाहीये.तिची खुशाली कळत नाहीये ! " ,मी म्हंटलं , "मीच तिला फोन बंद ठेवायला सांगितलाय.मी बघते ! " पण असं म्हणताना माझं काळीज चिरत गेलं ... खरच फोन उचलत नाहीये ! का ? काळजी वाटायला लागते ! आणि अचानक तिचा फोन येतो.पण फोनवरच्या आवाजाने ती निश्चितच बरी नाहीये हे कळल्यावर मात्र अजूनच जीव घाबरा होतो. आता घरी पोहोचेपर्यंत खरंच स्ट्रेस सहन होईना की काळजाला बरं वाटेना म्हणून मग घरी आल्याबरोबर गरम पाण्याने अंघोळ केली त्यानंतर आपसूक झाडूकडे हात वळला की , घर साफ केलं तर मन ही साफ होईल असं वाटून गेलं ! एवढयात सोसायटीतून गणपती बसवला आहे त्या ठिकाणाहून गाण्याचे बोल ऐकू आले ,
'इतनी शक्ती हमे देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना
किती खरे आहे ना ! आपण किती स्ट्रेस घेतो ? किती ताण देतो आपल्या मनाला ? पण एक छोटीशी गोष्ट विसरतो की जर तुम्ही नेक काम करत आहात तर भिती कसली?तुमचं स्वतःशी इमान राखून केलेलं काम क्षणिक दुःखाने , संकटांनी विरून जाणारं निश्चितच नसतं हेच सांगणारे मित्र -मैत्रीणींचे धीराचे शब्द, गाण्याच्या एक लकेर , घर आणि मन अधून -मधून साफ करत राहणं या साऱ्यांतून जगायलाच उर्जा मिळत असते, नाही ? आणि एका क्षणात हायस झालं तोपर्यंत घर पण झाडून झालं आणि मन पण कसं लख्ख झालं !
-आरती

No comments:
Post a Comment