🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*हो ! आहे माझा व्हॅलेंन्टाईन ...*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू*
*जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू*
*पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू*
*सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू*
अगदी जिवाचा जिवलग ! काळजाचा तुकडा !तुकडा कसलं आख्ख काळीजच ! आठ वर्षांचा आमचा प्रेमाचा सहवास. पुढच्या संपूर्ण श्वासांना जोडलेला !
काय , किती अन् कसं सांगू आमच्या दोघांबद्दल ... ! कुठून सुरूवात करावी बरं ? चॉकलेट पासून करूया का ? कारण चॉकलेट्स त्याला एवढी आवडतात की बस्स ! कदाचित माझ्यापेक्षाही जास्त ! आमच्यासाठी तर रोजच चॉकलेट डे असतो ! इतकी सारी चॉकलेट्स घरात असतात ! ती फक्त त्याला देण्यासाठी ! आपण मात्र मग मुद्दाम त्याच्याशी भांडावं, त्याला चिडवाव आणि तो रुसला की त्याची समजूत काढावी! आणि फुलं...! फुलं तर त्याला खूप प्रिय आहेत. फूल आणलं म्हणजे हळुवार तो आपल्या गालांवर फुलाचा स्पर्श करणार! मस्तपैकी डोळे बंद करून सुवास घेणार आणि मला गच्च मिठी मारून thank you पण म्हणणार ! अशा काय अन् किती आठवणी! आणि किस वरून तर आमच रोज भांडणं होणार ! कारण मला हवा असतो kiss! त्याच्या दोन्ही गालांवरचा ! आणि तो मात्र देणार नाही सहजासहजी !
मला आठवतं खूप सुरुवातीलाच मी त्याला टेडी आवडतात म्हणून टेडी बनवायचे शिकूनच घेतलं! आणि त्याच्यासाठी टेडी बनवले! पण टेडीमुळे माझ प्रेम वाटल गेला असं वाटायला लागलं teddy बनवल्यावर!
तो नसला की मग मात्र सारं जग सुन सुन होत ! कारण माझ्या कुशीत शिरल्याशिवाय त्याला झोप येत नाही ,हे मला ठाऊक आहे आणि मी तरी कुठे राहते त्याच्याशिवाय? त्याचे खाणं ,पिणं ,उठणं ,बसणं ,खेळणं बागडणं , हुंदडणं सगळ सगळ अगदी काळजात भरून राहिलय ! हो ...आहे तो माझा व्हॅलेंटाईन!
त्याच्यासाठीचा असणारे प्रेम एक दिवस व्यक्त करण्यासाठी नाही! वर्षभरात रोजच असतो आमचा व्हेलेंन्टाइन ! तो खऱ्या अर्थानं एका आईचं काळीज आहे!
प्रत्येक आई साठी रोजच असत तिचं लेकरू तिचा व्हॅलेंटाईन! असा व्हॅलेंटाईन फक्त माझाच आहे असं नाही ! प्रत्येक आई साठी हाच असतो तिचा खरा व्हॅलेंटाईन! तिचं अवघं विश्वच भरून जातं त्याच्या इवल्याशा छुमछुमनं ! फुलपाखराचे दिवस भुर्रकन उडून जातात; पण खर्या अर्थाने कुणासाठी तरी जगणं ,श्वास घेणं , जगण्याचा अर्थ कळणं हे घडतं ते केवळ लेकरू आल्यानंतरच! माझी बोलक्या डोळ्यांची बाहुली, बछडी ,छबु ,बबडी ,परी, शोनूलं हे सगळे अंतःकरणातून तेव्हाच येते जेव्हा घरात इवलीशी पावलं हुंदडू लागतात!! फुलपाखरांच्या दिवसातला व्हेलेंटाईन तर तिच्या लक्षातही राहत नाही ! कारण खरा आयुष्यभराचा व्हेलेंटाईन तिच्या आयुष्यात आलेला असतो आणि ती रोजच भरभरून भरभरून प्रेम करत असते! एका आईचं काळीज म्हणजे तिच्या मुलासाठी हक्काचं स्थान ...... खरा व्हॅलेंटाईन!!! म्हणूनच म्हटलं *हो आहे माझा व्हॅलेन्टाईन* माझं लेकरू .....आणि तो रोजच मी भरभरून साजरा करते ,आयुष्यभर करणार ! श्वासाच्या शेवटापर्यंत !!! माझं पिल्लू ....आत्ताच जेवू घालून निजवलाय ! मीही पटापट जेवून आवरते अन् झोपते त्याला कुशीत शिरायचं असतं ना माझ्या .......
*- तरुणची ताई ( आई ) आरती बोराडे*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:
Post a Comment