Sunday, April 29, 2018

थडगे

हात सुटला तसा श्वासही सुटला 
आणि मग सुरू झाले वादळांचे 
पाठशिवणीचे अनाव्रूत्त खेळ ! 

कधी मी अखंड समुद्र बनले 
शोधीत राहिले माझ्यात 
खोलवर असलेला तुझा तळ ! 
एकही आशेचा किरण पोहोचू नये 
तुझ्यापर्यँत ? 
संयत लाटांखाली असंख्य त्सुनामी 
आयुष्य मात्र प्रवाही अखंडपणे ! 
मी तळाशी निपचित पडून ! 

कधी धावत जावे 
अवकाशाच्या अंतापर्यंत 
उर फुटेस्तोवर ! 
संपत नाही प्रवास तुझ्यापर्यँतचा ! 
लवलेश नाही मी जिवंत असण्याचा ! 
जखमी श्वास देहात भरू पाहतो
नवी जिंदगी ......

पण छे .....तू नाहीच जवळ 
तेव्हा थडग्यापाशी माझ्या 
मी वाट पाहत थांबलेली ....! 


- आरती 

3 comments:

dilipborade said...

अप्रतिम रचना

SIDDHARTH SAPKALE said...

सुंदर ...अप्रतिम ..

माणसाचं सारं काही
अट्टाहास हा किती आणि कसा
कुठे चंगळ कुठे मंगळ
पण काय ना ...
जीवनाच्या सारीपाटाच्या सरतेशेवटी मात्र
नशिबी.... थडगंच !!!

project vedh "प्रोजेक्ट वेध " said...

मस्तच👌👌

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...